भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात आदिवासी दिन उत्साहात

Tribal Day celebrated with enthusiasm at P.K. Kotecha College in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.माधुरी भुतडा यांनी केले. त्यांनी जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आदिवासी जमातींच्या संस्कृतीला उजाळा मिळावा तसेच त्यांच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आदिवासी संस्कृतीचे जतन हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शरद अग्रवाल होते. त्यांनी आपल्या मनोगतात आदिवासी जमातींच्या समस्या जाणून घेता याव्या याबाबत विद्यार्थिनींना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
आदिवासी संस्कृतीचे घडले दर्शन
कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. त्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या निमित्ताने कविता बारेला, जयश्री सोनवणे, श्रावणी चौधरी, रक्षंदा जैन या विद्यार्थिनींनी आदिवासी वेशभूषा व आदिवासी नृत्य, गीत सादर केले. सूत्रसंचालन दिव्या बर्हाटे तर आभार कविता बारेला हिने मानले.