भुसावळात इनरव्हील रेल सिटीतर्फे राखी बनवण्यावर कार्यशाळा

Workshop on Rakhi making organized by Innerwheel Rail City in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे द वर्ल्ड स्कूल भुसावळ येथे राखी बनवण्याची कार्यशाळा नुकतीच झाली. संकल्पना वेस्ट टू बेस्ट अशी होती. ज्योती राठोड यांनी सर्व मुलांना प्रशिक्षण देण्याचे कार्य केले.
या प्रशिक्षणाद्वारे सुमारे 150 मुलांनी अत्यंत सुंदर राखी बनवल्या. या राख्या मुलांद्वारे आपल्या सीमेवरील लढणार्या सैनिकांना पाठवण्यात आल्या. या प्रशिक्षणाबद्दल क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रोजेक्टसाठी अध्यक्ष सीमा सोनार, सचिव योगीता वायकोळे, प्रोजेक्ट चेअरमन आदिती भडंग, रेवती मांडे, सुनीता पाचपांडे, हेमलता सोनार यांनी परिश्रम घेतले. वर्ल्ड स्कूलतर्फे आयोजकांचे कौतुक व सन्मान करण्यात आला. प्रसंगी सर्व स्टाफचे सहकार्य लाभले.