भुसावळात सैनिकांना बांधल्या राख्या
श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालय व रोटरी क्लब, ताप्ती व्हॅलीचा उपक्रम

Rakhis tied to soldiers in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : देश रक्षणासाठी अहोरात्र काम करणार्या जवानांना राख्या बांधून शहरात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी सैनिकांच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी सैनिकांनी मुलींना धन्यवाद देऊन त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली. हा उपक्रम रोटरी क्लब, ताप्ती व्हॅलीच्या माध्यमातून राबवण्यात आला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी, कार्यक्रम अधिाकरी डॉ.विवेक जोशी, एन.एन.एस.चे स्वयंसेवक आणि रोटरी क्लबचे सी.ए.मुकेश अग्रवाल, किशोर पाचपांडे, राम पंजाबी, मनिषा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.