भुसावळात चांगले हॉटेल दाखवतो म्हणत परप्रांतीयाला मारहाण करीत लाखाचा ऐवज लूटला

Migrant robbed of lakhs of rupees by beating him up while claiming to show him a good hotel in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : दिल्लीतील इसम मुलासह भुसावळात आल्यानंतर संशयीताला त्यांना चांगले हॉटेल दाखवतो म्हणत निर्जनस्थळी नेत मारहाण केली व त्याच्याकडील एक लाखांचा ऐवज लूटला. ही धक्कादायक घटना 7 जुलै रोजी दुपारी चार वाजता नवीन ईदगाह परिसरात घडली. याप्रकरणी सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले जंक्शनमध्ये
तक्रारदार प्रदीप त्रिलोकनाथ शर्मा (रमेश नगर, नवी दिल्ली) हे मुलगा मयंक शर्मासह 7 जुलै 2025 रोजी शहरात आल्यानंतर सात संशयीतांना त्यांना रेल्वे स्टेशन परिसरात चांगली हॉटेल दाखवतो म्हणत खडका रोडवरील नवीन ईदगाह परिसरात नेले व तेथे मारहाण केली. यावेळी तक्रारदाराकडील 15 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल, मुलगा मयंककडील 25 हजार 500 रुपयांची रोकड तसेच तक्रारदाराच्या मोबाईलमधील फोन पेद्वारे 50 हजार रुपये वळते केले.