भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात

भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास समिती व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रविवार, 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी स्व.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी पुष्पहार अर्पण केला. रक्षादिनानिमित वृक्षांना राखी बांधण्यात आल्या. क्रांती दिनानिमित शहिदांना श्रंदाजली वाहण्यात आली.
आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करण्याचा दिवस
डॉ.राजू फालक म्हणाले की, 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जाहीर केलेला आहे यामागील उद्देश म्हणजे जगातील विविध देशांतील आदिवासी समाजाचे हक्क, संस्कृती, परंपरा, भाषा आणि जीवनशैलीचे संरक्षण करणे, तसेच त्यांच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे होय .

आदिवासी समाज हा जगातील सर्वात प्राचीन समाजांपैकी एक आहे. ते निसर्गाशी सुसंवाद साधून राहतात व पारंपरिक ज्ञान जपतात. पर्यावरण संरक्षण, जैवविविधता, औषधी वनस्पतींचे ज्ञान यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे,
भारतात सुमारे 10 कोटीहून अधिक आदिवासी आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 8.6 टक्के आहेत. महाराष्ट्रातील गोंड, वारली, कोळी, भील, मदिया, थाकूर अशा अनेक जमाती या गटात मोडतात.
हा दिवस केवळ उत्सव नाही तर आदिवासी समाजाच्या अस्तित्व, हक्क आणि सन्मानासाठी एक जागरूकता अभियान आहे असे मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय चौधरी, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.डी.चौधरी, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अंजली पाटील, रासेयो अधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, सहायक रासेयो अधिकारी प्रा.डॉ.अनिल सावळे, महिला रासेयो अधिकारी
प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.आरती नवघरे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.जागृती सरोदे, प्रकाश सावळे, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित असल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.
