भुसावळातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात रक्षाबंधन उत्साहात

Raksha Bandhan भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : भुसावळातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली. शिक्षिकांनी शिक्षकांना राखी बांधून सण साजरा केला. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राखीचे प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थिनींनी झाडाला सुद्धा राखी बांधली.
झाडे आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप काही देतात या भावनेतून विद्यार्थिनींनी झाडाला जणू काही भाऊ मानूनच राखी बांधली.

वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे पौराणिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. समाजातील सर्व महिलांचा आदर सत्कार सर्वांनी केला पाहिजे आणि भावांनी बहिणीच्या रक्षणासाठी व सहकार्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे तसेच बहिणींनी सुद्धा भावाच्या सुखदुःखात नेहमी भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांनी केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
