भुसावळात 43 वर्ष जून्या कालबाह्य रॉ वॉटर पाईप लाईनमधून पाणीपुरवठा


Water supply through 43-year-old outdated raw water pipeline in Bhusawal भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : शहरातील रॉ वॉटर पपींग हाऊसमधून जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचा पुरवठा करणारी 500 मिमी व्यासाच्या दोन्ही पाईप लाईन जिर्ण झाल्या आहेत. पालिकेने तब्बल साडेपाच कोटींच्या निधीतून जलशुध्दीकरण यंत्रणेचे पुनरुज्जीवन केले. मात्र जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आणणारी 43 वर्ष जूनी पाईपलाइन अद्यापही बदलली गेली नसल्याचे चित्र आहे.

पाईप लाईनला झाले 57 वर्ष
रॉ वॉटर ते जलशुध्दीकरण केंद्रादरम्यान सन 1958 टाकलेली पाईप लाईनला तब्बल 57 वर्ष झाली आहे. सध्या या पाईप लाईनचा वापर बंद आहे. तर 1982 मधील पाईप लाईन आता जवळपास 43 वर्ष जूनी आहे. पाईप लाईनचे आयुर्मान साधारण 30 वर्षांचे असते. असे असतानाही यातील 1982 ची पाईप लाईन अजून कार्यरत आहे. यामुळे नवीन पाईप लाईन आवश्यक आहे. पालिकेने जलशुध्दीकरण केंद्राचे साडेपाच कोटींच्या निधीतून पुनरुज्जीवन केले मात्र या यंत्रणेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन जिर्ण असले तर त्यात पाणी येणार कसे? अर्थात आडातच नाही तर पोहर्‍यात पाणी कसे येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




अमृत लाईनचा वापर व्हावा
शहरातील पाईपलाइन देखील जिर्ण झाल्या आहेत. काही मेन रायझींग 1958 पासून आजपर्यंत सेवा देत आहेत. अमृत योजनेला अजून किमान एक ते दीड वर्ष लागेल. तोपर्यंत शहरातील अंतर्गत भागातील टाकलेल्या अमृत योजनेच्या पाईप लाईनचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबतही विचार होत नाही.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !