नागपूर-पुणे देशातील सर्वांत लांब 881 किमी अंतराची वंदे भारत एक्स्प्रेस


Nagpur-Pune is the longest Vande Bharat Express in the country with a distance of 881 km. भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : मध्य रेल्वेच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय लिहिला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रविवार, 10 रोजी अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. दरम्यान ही देशातील सर्वांत लांब अर्थात अधिक अंतराची वंदे भारत सेवा ठरली आहे. 881 किमी अंतर सरासरी 73 किमी प्रतितास वेगाने ती पार करेल.

12 वी वंदे मातरम एक्स्प्रेस
महाराष्ट्रातील ही 12 वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. वर्धा-मनमाड या आतापर्यंत वंदे भारत सेवा नसलेल्या भागाला पहिलीच वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही देशातील सर्वांत लांब वंदे भारत सेवा ठरली आहे. 881 किमी अंतर सरासरी 73 किमी प्रतितास वेगाने पार करेल.




नागपूर-संत्री नगरी आणि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे हे शहर दीक्षाभूमी, रामटेक, एआयआयएमएससह वैद्यकीय, पर्यटन आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे तर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, लाल महाल, शनिवार वाडा, शिवनेरी किल्ला, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, आलंदी, जेजुरी यांसारख्या स्थळांसाठी ओळखले जाते.या सेवेमुळे व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार व पर्यटकांना जलद, आरामदायक प्रवासाचा लाभ मिळणार असून उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळेल.

असे आहे वेळापत्रक
गाडी क्रमांक 26102 अजनी नागपूर -पुणे गाडी सोमवार वगळता सकाळी 9.50 वाजता सुटेल तर पुणे येथे रात्री 9.50 वाजता पुणे येथे पोहचेल.

गाडी क्रमांक 26101 पुणे-अजनी गाडी 11 ऑगस्टपासून (मंगळवार वगळता) सकाळी सहा वाजून 125 मिनिटांनी सुटेल तर अजनी येथे संध्याकाळी 6.25 वाजता पोहचेल. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन येथे थांबा राहिल.

अशा आहेत सुविधा
‘मेक इन इंडिया’चा अभिमान असलेली ही गाडी देशाच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतिक आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या 144 वंदे भारत सेवा सुरू आहे. पुढील तीन वर्षांत 200 हून अधिक गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. या गाडीला आठ डबे असून एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. त्यात 44 आसन तर सात चेअर कारमध्ये 546 जागा आहेत. वातानुकूलित डबे, आपोआप उघडणारे दरवाजे, एलईडी लाईट, बायो-वॅक्युम शौचालय, सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा यंत्रणा, ड्युअल सस्पेन्शन, ऊर्जा बचतीसाठी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली आदी सुविधा या गाडीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !