भडगाव तालुक्यातील जवानाला कर्तव्यावर वीर मरण

गुढ्यातील जवानाचे पार्थिक सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावाकडे रवाना : 12 रोजी अंत्यसंस्कार


A soldier from Bhadgaon taluka died in the line of duty. जळगाव (10 ऑगस्ट 2025) : 57 वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल स्वप्निल सुभाष सोनवणे (क्र. 140701865) यांचा सीमाप्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागल्याने वीर मरण आले. पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) रवाना करण्यात आले आहे.

ही घटना शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 7.23 वाजता बीओपी ढोलागुरी येथे घडली. जवान सोनवणे हे सीमा फ्लड लाईट खांब क्रमांक 17 दुरुस्त करण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून काँक्रिट बेसवर पडले. त्यांना तत्काळ बीएसएफ रुग्णवाहिकेतून सहकार्‍यासह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सायं. 8.35 वाजता डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.




मूळ गाव गुढे ता. भडगाव, जि. जळगाव येथे सैनिकी सन्मानाने मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार असून या संदर्भात पोलीस प्रशासनास सीमा सुरक्षा दलाने सहकार्याची विनंती केली आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !