भुसावळ तालुका फुटबॉल स्पर्धा : मुलांमध्ये ‘ताप्ती’चा तर मुलींमध्ये ‘बियाणी’चा संघ विजयी


Bhusawal Taluka Football Competition : ‘Tapti’ team wins in boys’ and ‘Biyani’ team wins in girls’ भुसावळ (11 ऑगस्ट 2025) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव , जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, भुसावळ पंचायत समिती, शिक्षण विभाग भुसावळ व सेंट लायसेस हायस्कूल आयोजित तालुकास्तरीय 14 वर्षाआतील शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा (मुलं आणि मुली) च्या गटाच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

यांची प्रमुख उपस्थिती
स्पर्धेत सहा मुलांच्या आणि तीन मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन सेंट अलायसेस संस्थेच्या चेअरमन सिस्टर अग्निस व शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला व महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन मेघा शाम शिंदे यांनी तर आभार अलेस्टर सिमोन्स यांनी मानले.


स्पर्धेचा निकाल असा
मुलांच्या उपांत्य फेरीत डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध बियाणी पब्लिक स्कूल डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल विजयी दुसरा उपांत्य फेरीचा सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट अलायसेस स्कूल भुसावळ यांच्यात झाला. ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.

अंतिम सामना ताप्ती पब्लिक विरुद्ध गोदावरी पब्लिक स्कूल यांच्यात झाला. यात ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.

मुलींच्या गटात अंतिम सामना बियाणी पब्लिक विरुद्ध वर्ल्ड स्कूल भुसावळ यांच्यात झाला या बियाणी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.

विजयी संघांना जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेत पंच म्हणून विजय निकम मोजेस चार्ज डेनिस चार्ज आदींनी सहकार्य केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !