विवाहबाह्य संबंधाचा वाद पोलिस निरीक्षकांच्या जीवावर

गया (11 ऑगस्ट 2025) : लग्नानंतर पोलिस खात्यातील उपनिरीक्षकाशी असलेल्या विवाहबाह्य संबंधानंतर लग्नाचा तगादा वाढल्याने पोलिस निरीक्षक अनुज कश्यप यांचा भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्या. याप्रकरणी प्रेयसी व संशयीत पोलिस उपनिरीक्षक स्वीटी यांना अटक करण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
अनुज कश्यप हे गया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या मीडिया सेलचे प्रभारी होते. रात्री पोलिसांच्या कारवाईची निवेदन प्रसिद्ध करून ते घरी गेले आणि सकाळी त्यांच्या मृत्यूचे निवेदन पोलिसांना द्यावे लागले.
अनुज कश्यप विवाहित होते. त्यांची पत्नी दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करते. अनुज आणि स्वीटी यांची भेट प्रशिक्षण काळातच झाली होती. त्यांच्या संबंधाबद्दल पोलीस विभागात माहिती होते. त्यामुळे नियुक्ती करताना दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग दिली गेली.
अनुज यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात तर स्वीटी कुमारीची बेलागंज पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. याच काळात अनुज यांचं लग्न झालं. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला. दोन वर्षापूर्वी लग्न झालेल्या अनुज यांची पत्नी युपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेली आणि अनुज भाड्याने फ्लॅट करून राहू लागले. त्यानंतर स्वीटी आणि अनुज जवळ आले.
पोलिस उपनिरीक्षक असलेल्या स्वीटी कुमारीने अनुज यांच्याकडे लग्नाची मागणी सुरू केली. पत्नीला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर, असा तगादा तिने लावला होता. याच कारणावरुन ती अनुज यांना मानसिक त्रास देऊ लागली.
शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी स्वीटी कुमारी आणि अनुज कश्यप यांच्यात व्हिडीओ कॉलवरून संवाद सुरू होता. पण, मध्येच वाद सुरू झाला आणि तो विकोपाला गेला. व्हिडीओ कॉल सुरू असतानाच अनुज कश्यप यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.