धुळे पोलिस दलातील कर्मचारी नोकरीतून बडतर्फ : कारण वाचून बसेल धक्का !

Dhule Police Force employee dismissed from job धुळे (11 ऑगस्ट 2025) : पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी घरोबा करणार्या धुळे पोलिस दलातील कर्मचार्याला पोलिस खात्यातून बडतर्फे करण्यात आले आहे. शाकिब कलीम शेख असे बडतर्फ कर्मचार्याचे नाव आहे. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण
शाकिब कलीम शेख हा कर्मचारी धुळ्यातील आझाद नगर पोलिस ठाण्यात नियुक्त होता. 5 नोव्हेंबर 2023 रोजी त्याने रश्मीन साकीब शेख सोबत विवाह केला व नंतर त्यास अपत्यही झाले. यानंतर पोलिस कर्मचार्याने एका तरुणीशी 1 जानेवारी 2025 रोजी मुस्लिम पद्धतीने लग्न केले. पहिली पत्नी हयात असताना व तीन महिन्यांचे अपत्य असताना पोलिस कर्मचार्याने दुसर्यांदा लग्न केल्याने त्याच्याविरोधात पहिल्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी 6 जानेवारी 25 रेाजी एपीआय जीवन बोरसे यांनी कतर विभागीय चौकशी पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी करीत जिल्हा पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केला. कर्मचार्याविरोधात दाखल झालेला गुन्हा पाहता त्यास 2 जानेवारी 2025 रोजी शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले तर सोमवार, 11 रोजी त्यास खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याची धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली.
