महाराष्ट्र पोलिस दलात 14 हजार पदे भरली जाणार : कॅबिनेटमध्ये आज निर्णयाची शक्यता


14 thousand posts to be filled in Maharashtra Police Force: Cabinet likely to take decision today मुंबई (12 ऑगस्ट 2025) : राज्य पोलिस दलात 14 हजार पोलिसांचे पदे भरण्यात येणार असून या संदर्भातील निर्णय मंगळवारी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

अनेक महिन्यांपासून या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या हजारो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती, ज्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण निर्माण होते मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया लवकरच वेगाने सुरू होणार आहे.




महायुती सरकारच्या या घोषणेनंतर लवकरच पोलिस भरती संदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील अनेक युवकांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मोठा संधी मिळणार आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष उपस्थित नसतील. एकनाथ शिंदे हे सध्या श्रीनगरमध्ये आहेत त्यामुळे ते या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहतील तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना दिल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भरत गोगावले हे नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !