भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात
भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील ‘द वर्ल्ड स्कूल’ भुसावळ येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषा परिधान करून परीक्षकांना परिचय दिला. अध्यक्षस्थानी कोलते फाऊंडेशनच्या संचालक रचना रोहित कोलते व निशिता अग्रवाल होत्या.
परीक्षकांचे स्वागत मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळेत, असे अध्यक्षा म्हणाल्या. यशस्वीतेसाठी प्री-प्रायमरी विभागाच्या शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.





