भुसावळातील श्री.र.न.मेहता विद्यामंदिरात ‘आझादी का अमृत महोत्सव’
‘Azadi Ka Amrit Mahotsav’ at Shri.R.N. Mehta Vidya Mandir in Bhusawal भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत तिरंगा- प्रेरित कलाकृतीने फलक सजवणे, तिरंगा रांगोळी स्पर्धाचे आयोजन, तिरंगा रॅली तसेच विविध उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करत आहे.
स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी करून देशासाठी लढणार्या स्वातंत्र्य सेनानी यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रीता शर्मा यांनी केले. शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.





