हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात पावसामुळे विसर्गात वाढ

पाणलोटक्षेत्रात दोन दिवस पाऊस


Rains in Hatnur catchment area cause increase in discharge भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती मात्र शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसामुळे धरणाचे सहा दरवाजे एक मीटर उघडून विसर्ग केला जात आहे. गेल्या गुरुवारी धरणाचे केवळ दोन दरवाजे अर्धा मिटरने उघउून विसर्ग झाला होता. पाणलोटक्षेत्रात अल्प प्रमाणात का असेना पाऊस झाल्याने काही अंशी विसर्गात वाढ झाली आहे.

धरणात जलपातळी वाढली
हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस ओसल्याने गुरुवारी केवळ 2 दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग झाला होता. शुक्रवार व शनिवारी झालेल्या सरासरी 8 मिमी पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली. यामुळे शनिवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा दरवाजे एक मिटरने उघडून विसर्ग झाला होता. रविवारी सलग दुसर्‍या दिवशी देखील हा विसर्ग कायम होता. यामुळे ताप ीनदीपात्रात 320 क्युमेक्स अर्थात 11 हजार 300 क्युसेस वेगाने विसर्ग करण्यात आला. हतनूर धरणाचे व्दार परिचालन व पुर नियंत्रण नियमांनुसार 10 ऑक्टोंबरपर्यंत 100 टक्के जलसाठा केला जातो.


यंदाही विसर्ग करुन हा जलसाठा होणार आहे. धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे सध्या तापीचे पात्र पून्हा खळाळले आहे. तापीमाई दुथळी भरुन वाहत आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत हतनूर धरणातून कमी प्रमाणात विसर्ग होत आहे. सध्या तापीचे पात्रात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या भागांची जलपातळी वाढीसाठी मदत होणार आहे. यंदा हतनूर धरणातून कमी प्रमाणात विसर्ग होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !