भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सवा’तून विद्यार्थ्यांना पाककलेची माहिती

रानभाज्यांमधील जिवनसत्वांचे महत्व उलगडले


Students learn about culinary arts through ‘Wild Vegetable Festival’ at Nahata College, Bhusawal भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रानभाज्या व पाककला प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रानभाज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची ओळख तसेच रानभाज्यांमधील जिवनसत्वांची माहिती यावेळी देण्यात आली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांच्याहस्ते करण्यात आले. उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विद्या पाटील, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख मनोज जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख
विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विविध रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली.स्पर्धेसाठी फक्त विद्यार्थिनीच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले. प्रा.डॉ.विद्या पाटील यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे नियोजन व आयोजनासाठी समिती सदस्य प्रा.सपना नारखेडे, प्रा.श्रृती रूले, प्रा.ज्योती जंगले, प्रा.वसीम शेख, प्रा.वंदना राठोड, प्रा.वर्षा अठे यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

रानभाज्यांचा घेतला आस्वाद
कटूरले, अंबाडी, अळू, तांदूळ जीरा, अंबूशी, चीवई, अशा विविध रानभाज्यांच्या पाककला विद्यार्थ्यानी सादर केल्या व त्याचा आस्वाद घेतला. रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, रानभाज्या खनिजे, जीवनसत्व संपन्न असतात. त्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !