भुसावळातील श्री संत गाडगे बाबा महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात
National Library Day celebrated with enthusiasm at Shri Sant Gadge Baba College, Bhusawal भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालयात एस.आर. रंगनाथन जयंती निमित्ताने ग्रंथालय दिवस साजरा करण्यात आला. एन.एस.एस.युनिट मार्फत एन.एस.एस.स्वयंसेवकासाठी ‘माय भारत पोर्टल’ अंतर्गत नोंदणी वर्कशॉप ग्रंथायलात घेण्यात आला.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश गुप्ता यांनी ग्रंथालयाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ग्रंथालयातील सेवा व सुविधा कोणत्या आहेत हे सुद्धा सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात यावे व आपले ज्ञान वृद्धींगत करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात एन.एन.एस.युनिटमार्फत विद्यार्थ्यांची नोंदणी माय भारत पोर्टलवर करण्यात आली.

पोर्टल संदर्भात संपूर्ण माहिती रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा व डॉ.विवेक जोशी यांना दिली. यावेळी आर.टी.एम.एन. यू. स्टूडेंट ऍप व युनि कनेक्ट अॅप काय आहे हे अॅप कसे काम करते तसेच विद्यार्थ्यांसाठी ते कसे महत्वाचे आहे हे सांगण्यात आले. ग्रंथालयदिन व
वर्कशॉपसाठी आवर्जून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.जोशी यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात प्राचार्यांनी महाविद्यालयाचे ग्रंथालय किती समृद्ध आणि सर्व समावेशक आहे हे सांगितले.
कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.




