धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार जावेद नक्ट्या स्थानबद्ध


Notorious criminal Javed Naktya from Dhule arrested धुळे (13 ऑगस्ट 2025) : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍यांवर पोलिस दलाकडून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यातच पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नक्टया यास एमपीडीए कायद्यान्वये नाशिक जेलमध्ये स्थानबध्द करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गुन्हेगारांवर धडक कारवाई
धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याकडून धुळ्यासह जिल्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडीए, हद्दपारी, मोक्का आदी प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने मोठे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून समाज विघातक कृत्य करणारे तसेच शरीर व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे धोकादायक झालेला कुख्यात गुन्हेगाराविरोधात एमपीडीएचा प्रस्ताव धुळे शहर पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर कुख्यात गुन्हेगार शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नक्ट्या (37, मुळ रा.मोगलाई, साक्रीरोड, धुळे हल्ली मुक्काम जामचा मळा, सुमैय्या लॉन्स मागे, शंभर फुटीरोड, धुळे) यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढल्यानंतर संशयीताला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.




यांनी केली कारवाई
धुळे शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी एमपीडीएचा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या माध्यमातून सादर केला व गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांनी छाननी केल्यानंतर प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !