भुसावळात फुटबॉल स्पर्धा : मुलींमध्ये डॉ.उल्हास पाटील स्कूल तर मुलांमध्ये ताप्ती स्कूल विजयी


भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व क्रीडा विभाग, भुसावळ यांच्याद्वारे
17 वर्षाखालील मुले-मुली फुटबॉल स्पर्धा सेंट अलॉयसेस हायस्कूलच्या मैदानावर पार पडल्या. उद्घाटन तहसीलदार नीता लबडे यांच्याहस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
नायब तहसीलदार शोभा घुले, शारीरिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, सेंट अलॉयसेस शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव आबीद सर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका क्रीडा समन्वयक डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते मैदानावर पूजन करून बॉलला किक मारून उद्घाटन करण्यात आले.


असा आहे स्पर्धेचा निकाल
उपांत्य फेरीचा सामना सेंट अलॉयसीस स्कूलविरुद्ध बियाणी पब्लिक स्कूल यांच्यात झाला. सेंट अलॉयसीस स्कूलने दोन शून्य ने विजय मिळविला.

दुसरा उपांत्य फेरीचा सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये झाला. ताप्ती पब्लिक स्कूल तीन शून्यने विजयी झाली. अंतिम सामना ताप्ती पब्लिक स्कूलविरुद्ध सेंट अलॉयसीस स्कूल यांच्यात झाला. यात ताप्ती पब्लिक व स्कूलने पेनल्टी शुट वर पाच चार ने एका गोलने विजय मिळविला.

मुलींच्या सामन्यात अंतिम सामना सेंट अलॉयसीस स्कूलविरुद्ध डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला. यात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल एक शून्यने विजय मिळविला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक सिस्टर शोभना यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक मेघशाम शिंदे, अलस्टर सिमोन्स तसेच मोजेस चार्ज, डेनिस चार्ज, विजय निकम, मुजम्मिल खान,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुक्यातील क्रीडा शिक्षक आदींनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !