भुसावळ-बडनेरा खंडात नॉन इंटरलॉकिंग काम ; आज बडनेरा-अमरावती मेमूसह चार गाड्या रद्द, तीन गाड्या होणार लेट
Non-interlocking work on Bhusawal-Badnera section ; Four trains including Badnera-Amravati MEMU cancelled today, three trains will be late भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-बडनेरा खंडात शेगाव-श्रीक्षेत्र नागझरी आणि पारस दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील 4 गाड्या रद्द केल्या तर तीन गाड्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने सुटणार आहे. एका गाडीच्या वेळेत बदल केला आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
आज रेल्वेचा ब्लॉक
रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या कामानिमीत्त रेल्वे प्रशासनाने गुरुवार, 14 रोजी ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळकडून बडनेर्याकडे जाणार्या रेल्वे गाड्यांवर या ब्लॉकचा फटका बसणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वेच्या पायाभूत सुविधा उन्नतीसाठी आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी व आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी घेतले आहे. दरम्यान, गाडी 11121 भुसावळ ते वर्धा मेमू ही गाडी भुसावळ येथून दुपारी 2.25 वाजता सुटण्याऐवजी 3.15 वाजता सुटेल. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
रद्द होणार्या गाड्या (14 ऑगस्ट 2025)
गाडी 61101 – भुसावळ ते बडनेरा मेमू
गाडी 61102 – बडनेरा ते भुसावळ मेमू
गाडी 61115 – बडनेरा ते अमरावती मेमू
गाडी 61116 – अमरावती ते बडनेरा मेमू
विलंबाने धावणार्या रेल्वे गाड्या
गाडी 11040 गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस विभागात 2 तास लेट राहणार, गाडी 12485 हजूर साहिब नांदेड-श्री गंगानगर एक्सप्रेस विभागात 1 तास 10 मिनिटे लेट, गाडी 20820 ओखा-पुरी एक्सप्रेस विभागात 2 तास थांबविण्यात येणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.




