भुसावळ-भादली दरम्यान आरओबी रुंदीकरणासाठी स्टील गर्डर टाकण्यास सुरूवात


Steel girder laying begins for ROB widening between Bhusawal-Bhadli भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : भुसावळ-भादली स्थानकांदरम्यान इगतपुरी-भुसावळ रेल्वे मार्गावर कि.मी. 433, 15 – 17 येथे राष्ट्रीय महामार्गावरील (नागपूर हायवे) जुन्या पुलाच्या जागी नवीन रेल्वे ओव्हर ब्रिज रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. या कामाच्या अनुषंगाने पाच स्टील प्लेट गार्डर्सच्या यशस्वी लाँचिंगला बुधवार, 13 ऑगस्टपासून सुरूवात केली आहे. यामुळे रेल्वेने चार दिवस भुसावळ-भादली दरम्यान ब्लॉक घेतला आहे. याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर होत आहे.

बीओटी तत्वावर काम
वाहतूक सुरळीत करण्यासाठी बीओटी तत्त्वावर हाती घेतलेल्या या प्रकल्पासाठी पहिल्या चार दिवसांमध्ये अप लाईन, डाऊन लाईन, तिसरी व चौथी लाईन अशा सर्व मार्गांवर एकत्रितपणे ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने या कामासाठी दररोज 1 तास 30 मिनिटांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक मंजूर केला आहे. लाँचिंग कार्य पुढील तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. हा ब्लॉक सकाळी 9 पासून सुरू होत आहे. यामुळे या मार्गावरील मुंबईकडे जाणार्‍या रेल्वे गाड्या लेट होत आहे. बुधवारी काशी एक्स्प्रेस 2, गोवा एक्स्प्रेस 2.30, ताप्तीगंगा एक्स्प्रेस 1.30, भुसावळ सुरत गाडी दोन तास विलंबाने भुसावळातून सुटली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतल्यास दोन दिवस अगोदर जाहीर करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !