भुसावळ स्टेशनवर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा समन्वय बैठक


Security coordination meeting at Bhusawal station on the eve of Independence Day भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : स्वातंत्र्य दिनानिमित्त भुसावळ रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी बुधवारी अधिकृत व्हेंडर, कुली, पाणीपुरवठा कर्मचारी, पार्सल विभागातील कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांची समन्वय बैठक घेण्यात आली. ही बैठक सहायक सुरक्षा आयुक्त अशोककुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानक निरीक्षक पी.आर.मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कळवण्याचे आवाहन
बैठकीत उपस्थित सर्वांना 15 ऑगस्ट रोजी स्थानक परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित आरपीएफ, जीआरपी अथवा शहर पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्यस्थळी सतर्क राहून प्रवासी व परिसरावर लक्ष ठेवावे, सोडून दिलेला कोणताही सामान दुर्लक्षित करू नये, अशी सूचना करण्यात आली.


आरपीएफ कार्यालयात बैठक
गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवणे, कोणतीही अफवा पसरविण्यापासून दूर राहणे आणि सुरक्षा दलांना सहकार्य करणे, अशा सूचना देखील देण्यात आल्या. यावेळी सहायक आयुक्त अशोककुमार यांनी रेल्वे स्थानकावर श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याच्या सूचना केल्यात तर निरीक्षक मीणा यांनी प्रत्येक कर्मचार्‍यांनी सतर्क राहून काही चुकीचे अथवा संशयास्पद वाटल्यास सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्याच्या सूचना केल्यात. ही बैठक आरपीएफ कार्यालयात आयोजीत करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !