सैन्य दलातील अधिकार्‍याच्या नावाने धुळ्यात डॉक्टरांना लाखाचा गंडा

पोलिसांच्या सतर्कतेने 83 हजार रुपये परत मिळवण्यात यश


Doctors in Dhule duped of lakhs in the name of an army officer धुळे (14 ऑगस्ट 2025) : धुळ्यातील डॉ.प्रशांत देवरे यांच्याशी सायबर भामट्याने सैन्यातील अधिकारी बोलत असल्याचे सांगून एक लाखांचा गंडा घातला मात्र वेळीच सतर्क झालेल्या डॉक्टरांनी पोलिसांची मदत घेतल्यानंतर खात्यातून वळते करण्यात आलेले 83 हजार रुपये वाचवण्यात यश आले.

काय आहे फसवणूक प्रकरण
मी सैन्य दलातील अधिकारी बोलतोय, अशी सुरुवात करीत भामट्याने सैन्य दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करावयाची असल्याचे सांगून डॉ.देवरे यांच्याशी 11 रोजी एका पॅथालॉजी लॅबची ओळख देत संपर्क साधला.




आम्हाला आमच्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची सामूहिक वैद्यकीय तपासणी करावयाची आहे. आपण आम्हाला सवलतीच्या दरात या तपासण्या करुन द्याव्यात, अशी विनंती संबंधिताने केली. या बोलण्यावर डॉ. देवरे यांचा विश्वास बसल्याने त्यांनी सैन्यातील अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या व्यक्तीने तपासणी प्रक्रियेसाठी म्हणून सुरुवातीला 15 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने डॉ. देवरे यांना विश्वासात घेवून त्यांच्या भ्रमणध्वनीची माहिती घेतली आणि डॉ.देवरे यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन 98 हजार 969 रुपये काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे डॉ. देवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संवाद साधत गुन्हा दाखल केला. यंत्रणेने संबंधीत बँकेशी संपर्क साधताच डॉ.देवरे यांच्या बँक खात्यातील 83 हजार रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !