भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात


भुसावळ (15 जुलै 2025) : शहरातील आनंद नगरस्थित गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.सांतनू कुमार साहू यांच्याहस्ते ध्वजपूजनानंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांनी कलागुण सादर करीत वाहव्वा मिळवली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका ईतीश्री साहू, फार्मासिस्ट जितेश ढाके, सुपर वायझर रियाज पटेल, एच.आर.गिरीश कोळी, डॉ.धनुष, चेतन जाधव, रुचिता इंगळे, कांचन खुपसे, शिवानी साळवे, खुशी कासडे, रेहान शेख, कृष्णा सोनवणे, लता बोरनारे, रवी नकवाल, दीपेन नकवाल आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गोल्डन अवर हॉस्पीटलचे पीआरओ गणेश वाघ यांनी करूनही आभारही मानले. यशस्वीतेसाठी हॉस्पीटलच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !