भुसावळात रिपरिप पावसानंतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डयात पाणी
पादचारी व वाहनधारकांना चालणेही झाले कठीण
भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : शहरात रिपरिप पावसानंतरही काही भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. ख्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरणगाव रोडवरील जुनी पालिका ते छ. शिवाजी महाराज नगर मार्ग, जाममोहल्ला ते भजे गल्ली, आगाखानवाडा, काझी प्लॉटचा अंतर्गत भाग आदींसह अनेक भागांमध्ये खड्डयांमध्ये पाणी शिरल्याने वाहनधारक व पादचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ते झाले खिळखिळे
शहरात सलग पावसानंतर प्रमुख रस्ते खिळखिळे झाले आहे. पालिका हद्दीबाहेरील रस्ते तर अखेरची घटका मोजत आहे तर आता दुसरीकडे आता पालिकेच्या हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर लहान आकाराचे खड्डे पाणी साचून मोठे झाले. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विस्तारीत भागातील रस्त्यांवर चिखल तसेच खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पायी चालणेही कठीण झाले आहे.

शहरातील अंतर्गत भागासोबतच जामनेर, जळगाव, शिवपूर कन्हाळे, खडकारोड आदी भागातील पालिकेच्या हद्दीबाहेरील तसेच प्रांताच्या अख्यतारीत येणार्या भागातील रस्तेही चिखलमय आहेत. या रस्त्यांवरुन नागरिकांना चालणेही कठीण होत आहे. केवळ पालिकेच्या हद्दीबाहेर असल्याने या भागात विकासकामे होत नसल्याची स्थिती आहे. या ठिकाणी वाहनधारकांना तारेवरची कसरत करुन वापरावे लागत आहे.आधीच खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मानपाठीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यातच आता पावसानंतर खड्ड्यांचे आकार वाढल्याने हे दूखणे वाढले आहे.
यावल रोड अल्पावधीत खिळखिळा
मुख्य मार्गावरील यावलरोडवर सेंट लायसेंस शाळा परिसर, तापीनगर रिक्षा स्टॉपपर्यंतचा रस्ता खिळखिळा झाला आहे.जळगावरोडवर सतारे चौकातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळा चौक यापूढील भागातील भोईनगर परिसरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यावलर ोडच्या डांबरीकरणाला अद्याप सहा महिनेही झाले नाही, तोच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.




