स्वातंत्र्यदिन : भुसावळ जंक्शनवर श्वान पथकाकडून कसून तपासणी
भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) व लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून गुरुवारी श्वान पथकाच्या मदतीने सखोल तपासणी करण्यात आली.
तिकीट खिडकी, मुसाफिर खाना, पार्कींग परिसर, प्रतिक्षालय, प्लॅटफॉर्मवरील पार्सल विभाग, तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी श्वान पथकाने तपासणी केली. या कारवाईत प्रवाशांच्या बॅगा लगेज स्कॅनरद्वारे तपासण्यात आल्या, तर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरही तपासणीचे काटेकोर नियोजन करण्यात आले.
ही तपासणी आयपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी आणि सहायक आयुक्त अशोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक पी.आर.मीना आणि लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफ जवान आणि लोहमार्ग पोलिसांचे पथक सक्रीय होते.
प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याचे रेल्वे सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले.