भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात गीत गायन स्पर्धेसह विविध कार्यक्रम


भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती दिनानिमित्त देशभक्तीवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 12 रोजी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन युवती सभेच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले तसेच बुधवार, 13 रोजी महाअवयव दिनानिमित्त ‘अवयव दान’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.

‘तिरंगा आमचा अभिमान’ या विषयावर सुद्धा पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.


गुरुवार, 14 रोजी तिरंगा जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. शुक्रवार, 15 रोजी झेंडावंदनानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेचे सचिव संजय सुराणा यांच्याहस्ते महाविद्यालय परिसर समिती व रासेयो एकक यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला.

‘एक पेड मा के नाम’ या अभियान अंतर्गत विद्यार्थिनींना रोपवाटप करण्यात आले. सर्व कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल, डॉ. जीवन धांडे, रासेयो प्रमुख डॉ.मीना चौधरी, रासेयो सहाय्यक प्रा.निलेश गुरुचळ, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.उज्वला महाजन, प्रा.मुक्ती जैन उपस्थित होते. सर्व कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !