भुसावळातील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये ध्वजारोहण उत्साहात


भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : नगरपरिषद संचलित म्युन्सीपल हायस्कूलमध्ये 79 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.मेढे यांच्याहस्ते करण्यात आले. उत्सवानिमित्त संपूर्ण शाळा रांगोळ्या, पताकांनी सजविण्यात आली व सकाळपासून देशभक्तीपर गीतांनी शालेय परिसर दणाणला.

कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वज संचलन डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत व झेंडा गीत म्हटले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.


सूत्रसंचालन एन.एच.राठोड यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !