भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘पदम’ नियतकालिकाचे प्रकाशन
भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘पदम’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन स्वातंत्र्यदिनानिमित्त झाले. श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, भुसावळचे सचिव संजय सुराणा यांच्याहस्ते प्रकाशन झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शरद अग्रवाल, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.व्ही.एस.खरे, नियतकालिक समिती प्रमुख प्रा.निलेश गुरुचल, प्रा.के.सी.सूर्यवंशी, डॉ.गिरीश कोळी, प्रा.विनोद भालेराव, प्रा.गिरीश सरोदे उपस्थित होते.

पदम नियतकालिक विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देत साहित्य, कविता, चारोळ्या, सुविचार तसेच वर्षभरातील महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा सादर करते. प्राध्यापकांच्या संशोधन लेख, पुस्तके आणि विद्यार्थिनींची यशोगाथा फोटोसह प्रकाशित करणे ही याची वैशिष्ट्ये आहेत.




