मच गया शोर सारी नगरी रे… : भुसावळातील श्री.र.न.मेहता विद्यामंदिरात श्रीकृष्ट जन्माष्टमी उत्साहात


Shri Krishna Janmashtami celebrated with enthusiasm at Shri.R.N. Mehta Vidya Mandir in Bhusawal भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : हिंदी सेवा मंडळ संचालित श्री र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवानिमित्त रंगभरण स्पर्धा, मटकी सजावट स्पर्धा, राधाकृष्ण युगल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
श्री.डी.एल.हिंदी विद्यालयार्फे हिंदी सेवा मंडळ अमृत महोत्सवानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले.
वेशभूषा स्पर्धा- प्रथम गट- मानवी प्रकाश चडार (इयत्ता चौथी- प्रथम क्रमांक), फैजान तनवीर रंगरेज (इयत्ता पहिली -द्वितीय क्रमांक), त्रिजल कपिल रोकडे (इयत्ता दुसरी- तृतीय क्रमांक)


गट क्रमांक 2- रत्नाली राजेंद्र हिवाळे (इयत्ता सहावी- प्रथम क्रमांक)

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रंगभरण स्पर्धेचा निकाल असा

इयत्ता तिसरी- नंदिनी तुषार वाघ (मराठी तिसरी), त्रिशा कपिल परदेशी (इंग्रजी तिसरी), अलिशा सैय्यद भूरा (हिंदी तिसरी), उत्तेजनार्थ (आलिया तनवीर अहमद (इंग्रजी तिसरी)

इयत्ता चौथी- आकांक्षा आकाश गायकवाड (इंग्रजी चौथी), प्रियंका संजय शिंदे (मराठी चौथी), काशीफ इकबाल शेख (हिंदी चौथी), उत्तेजनार्थ- मानवी प्रकाश चडार (हिंदी चौथी)

छात्रस्मृती- किर्ती विजय जोहरे (मराठी तिसरी), माही सदाशिव गौर (हिंदी चौथी), पूर्वी सुनील सुरवाडे (मराठी चौथी), उत्तेजनार्थ- सानिया खान आझाद खान (हिंदी चौथी)

मटकी सजावट स्पर्धा 2025- मानवी सुरेंद्र जगताप (प्रथम), आसमा अमीन तडवी (द्वितीय), आयुष विशाल महाजन (तृतीय)

युगल जोडी स्पर्धा 2025 निकाल- प्रथम- शुभांगी संजय पाल व रुद्रा संदीप पाटील, द्वितीय- धम्मदीप अर्जुन सोनवणे, एकता युवराज भंकड, तृतीय- अली शेख सत्तार, समायरा शेख इसराइल

श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडी फोडून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विद्यालय राबवत असलेल्या विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे संस्थेने कौतुक केले. सूत्रसंचालन वैशाली चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन उमेश खोडपे यांनी मानले.

तर समाजही करेल प्रगती : रिता शर्मा
दहीहंडीत ज्या प्रकारे सर्व पदार्थ एकत्र केले जातात आणि दहीहंडीतील प्रसाद अतिशय गोड लागतो त्याप्रमाणे समाजातील सर्व लोक एकत्र राहून चांगले कार्य केले तर समाज प्रगती करेल, असे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांनी केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !