भुसावळातील ताप्ती स्कूलमध्ये श्रीकृष्णा जन्माष्टमी उत्साहात
Shri Krishna Janmashtami is celebrated with enthusiasm at Tapti School in Bhusawal भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी हे श्रीकृष्णाच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी ह्या राधाच्या वेशभूषेत शाळेत दाखल झाले.
इयत्ता नर्सरी ते चौथीच्या 600 विद्यार्थ्यांनी शाळेत बांधलेली दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना चॉकलेट व प्रसाद देण्यात आला. यावेळी ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल माहिती सांगितली. प्रसंगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.





