डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात
Shri Krishna Janmashtami is celebrated with enthusiasm at Dr. Ulhas Patil English Medium School सावदा, ता.रावेर (16 ऑगस्ट 2025) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले.
श्रीकृष्ण जन्माचा, श्रीकृष्णाच्या नटखट लीला, माखन चोरी आणि गोवर्धन पूजा करून पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन कसे केले जाते याचा संदेश गोवर्धन पूजेतून व देखाव्यातून देण्यात आला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या रासलीला आणि या रासलीलेतून प्रेमाचे प्रतीक आणि प्रेम भावना कशी जोपासली जाते हे दृश्य दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांनी केले.





