भुसावळ शहरातील दे.ना.भोळे महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात
भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी समाजसेवक प्रवीण भोळे, न्या.संजय बुंधे, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले.

यशस्वीतेसाठी रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, सुधाकर चौधरी, विजय पाटील, दीपक महाजन यांनी परिश्रम घेतले.




