साकेगाव श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प.पू.के.के.शास्त्रीजी, प.पू.विष्णू स्वामीजी, गोपाळ भगतज, शल शशिकांत कोल्हे, डॉ.जे.के.भिरुड, पी.एस.लोखंडे, ए.गो.चौधरी, किरण चौधरी उपस्थित होते. प.पू.के.के.शास्त्रीजी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याच बरोबर प.पू.के.के.शास्त्रीजी यांनी अमेरिकेत सत्संगाच्या माध्यमातून जनजागृती केली. त्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन दीपक बाविस्कर व भारती खडसे यांनी केले. यावेळी चारही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.





