हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले : प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग : नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन


18 gates of Hatnur Dam opened: Administration issues alert भुसावळ (17 ऑगस्ट 2025) : हतनूर धरणाच्या लाभ क्षेत्रात झालेल्या पावसानंतर धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्याने धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दोन दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 16 दरवाजे एका मीटरने उघडण्यात आल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, अंजनी धरणातून अंजनी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.


हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले
हतनूर प्रशासनाच्या माहितीनुसार, धरणात या क्षणाला 43.84 टक्के जलसाठा असून दोन गेट पूर्ण क्षमतेने तर 16 दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1261 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजच्या दिवशी 54 मिलीमीटर तर आतापर्यंत 347 मिलीमीटर पाऊस झाल्याचे धरणावरील सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नदीकाठावर जाणे टाळावे तसेच गुरेढोरे, शेतीसाहित्य व अन्य बाबींची योग्य ती खबरदारी घ्यावी. सुरक्षा उपाययोजना पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !