भुसावळातील गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सांस्कृतिक कार्यक्रम
Independence Day cultural program at Godavari English School, Bhusawal भुसावळ (17 ऑगस्ट 2025) : शहरातील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलशमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोगत, नृत्य व गायनाद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना दिली. कार्यक्रमास मुख्याध्यापिका अनघा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.





