धुळ्यात ‘विषारी कोब्रा’ चा बर्थडे : कथित सर्पमित्राला बेड्या


‘Poisonous cobra’s’ birthday in Dhule: Alleged snake friend chained धुळे (18 ऑगस्ट 2025) : सोशल मिडीयावरील रिल्स व टीआरपीच्या नादात कथित सर्पमित्राने विषारी कोब्रा जातीच्या नागाचा बर्थडे सेलिब्रेट करीत त्याचा रिल बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केला. वनविभागाने याची दखल घेत कथित सर्पमित्राला बेड्या ठोकल्या. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे हा प्रकार घडला. राजू भाऊसाहेब वाघ असे कथित सर्पमित्राचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार
बोराडीतील राजू वाघ या तरुणाने कोब्रा विषारी नाग पकडून आणत नागपंचमीच्या दिवशी त्याच्यासमोर केक ठेवत व्हिडीओ केला. शिवाय हा व्हिडिओ मिडीयावर पलोड केल्याने तो तुफान होवून वनविभागापर्यंत पोहोचला. सुमारे 23 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये कोब्रा नाग हा समोर फणा काढून असून त्याच्याभोवती अनेक तरुण राहून ‘हॅथी बर्थ डे, भाई का’ म्हणत टाळ्या वाजवत आहे. काही जण उत्साहात नाचत याच ठिकाणी काही मुले उभी असून पेटत्या मेणबत्तीवर नाग चिडून दंश करीत असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. दरम्यान, आरोपीला वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली तर विषारी नागालाा आरोपीने जंगलात सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !