सराफा व्यावसायिकाकडून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार


23-year-old girl raped by bullion merchant गडचिरोली (18 ऑगस्ट 2025) :  लग्न करण्याचे आमिष दाखवत एका सराफाने 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये घडली. विशेष म्हणजे अत्याचार करतानाच व्हिडीओ बनवले आणि हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

सुनील पंडलिक बोके असे आरोपीचे नाव आहे. तर अक्षय कुंदनवार याच्यावरही आरोपीची मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.




23 वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीचे देसाईगंजमधील गांधी वार्ड परिसरात ज्वेलर्सचे दुकान आहे. तरुणी कामानिमित्त दुकानात गेली होती. त्यानंतर आरोपी सुनील बोके याने तरुणीशी संपर्क सुरू केला.

तरुणीला आरोपीने तुझ्याशी लग्न करतो असे सांगितले. त्यानंतर दोघांमध्येही जवळी निर्माण झाली. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तरुणीला ब्लॅकमेल करू लागला.

आरोपीने ब्लॅकमेल करत तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. त्यानंतर मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळेल्या तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला. त्यानंतर आरोपी बोकेने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार याच्या मदतीने तिच्या संपर्क केला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दबाव आणला.

सगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत असल्याने तरुणीने देसाईगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !