उत्तर भारतातील पावसाचा फटका : रावेरच्या केळी दरात घसरण


Rains hit North India: Banana prices drop in Raver रावेर (19 ऑगस्ट 2025) : उत्तर भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होताच त्याचा फटका केळी दराला जाणवू लागला आहे. किरकोळ बाजारपेठेत ग्राहक नसल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे.

गत काही आठवड्यांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे तर बाजारपेठा ठप्प असल्याने केळीची मागणी प्रचंड घटली आहे. कापणी अभावी शेतात तयार असलेला माल तुंबायला सुरवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेची परिस्थिती कधी सुधारेल याकडे शेतकर्‍यांचे लक्ष आहे.




गेल्या पंधरवड्यात साधारणतः उच्च प्रतीच्या केळीची 2500 रूपये क्विंटल दराने विक्री होत होती. आता हे दर 700 ते 1100 रूपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहे. मध्यम व खालच्या दर्जाच्या केळीची काही भागात मनमर्जीने दराने खरेदी होते आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यापासून रेल्वेद्वारे दिल्ली येथे केळी पाठवली जात होती. मात्र, यावर्षी मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ सुस्थितीत असल्याने अद्याप रॅक लावायची वेळ आली नाही. रावेर तालुक्यात सध्या दर्जेदार केळीला मातीमोल भाव मिळत आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !