महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या फैजपूर शहराध्यक्षपदी शाकिर मलक
Shakir Malak appointed as Faizpur city president of Maharashtra State Journalists Association फैजपूर (19 ऑगस्ट 2025) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या फैजपूर शहराध्यक्षपदी शाकिर मलक यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष गोविंदा वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी यांच्या आदेशानुसार यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन यांची निवड केली आहे.

असे आहेत उर्वरीत पदाधिकारी
यावल तालुका सल्लागार संजय सराफ, यावल तालुका उपाध्यक्ष गोकुळ कोळी, तालुका कार्याध्यक्ष सुरेश खैरनार, यावल तालुका सरचिटणीस प्रा.उमाकांत रुपचंद पाटील, यावल तालुका प्रसिद्धी प्रमुख किरण पाटील, यावल तालुका संघटक ज्ञानेश्वर तायडे, फैजपूर शहराध्यक्ष मलक शाकिर मलक मुसा, यावल शहराध्यक्ष मलक शाबीर यांची निवड करण्यात आली व तालुकाध्यक्ष विशाल दांडगे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
शकीर मलिक याची निवड झाल्याने फैजपूर येथील कामगार संघटना व विविध संस्था संचालक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकार्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.




