भुसावळातील समाजसेवक दीपक धांडे यांची गोल्डन अवर रुग्णालयाला सदिच्छा भेट

हॉस्पीटलमधील उपलब्ध सुविधांची जाणली माहिती ः डॉ.सांतनू कुमार साहू यांनी केले स्वागत


Social worker Deepak Dhande भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : भुसावळातील समाजसेवक व शिंदे गटाचे पदाधिकारी दीपक धांडे यांनी नुकतीच शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली. डॉ.सांतनू कुमार साहू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

सुविधांची जाणली माहिती
यावेळी दीपक धांडे यांना रुग्णालयातील विविधांगी सुविधांची माहिती डॉ.साहू यांनी दिली. शहरातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये केवळ भुसावळ शहरच नव्हे तर भुसावळ विभागातील यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांशी गावांसह तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांसह मध्यप्रदेश सीमेतील बर्‍हाणपूर भागातील सुमारे 15 हजारांवर रुग्ण शर्थीच्या उपचाराअंती उपचार घेवून घरी गेल्याचे डॉ.साहू यांनी सांगितले.


चार हजारांवर रुग्णांवर शस्त्रक्रिया
प्रत्येक आपत्कालीन स्थितीत भुसावळसह जिल्हाभरातील रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर हॉस्पिटल’ हे खरोखरच गोल्डन अवर ठरत आहे. वैद्यकीय सेवेच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात 15 हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी व यशस्वी उपचारासह 15 हजारांवर क्रिटिकल स्थितीतील रुग्णांवर उपचार तर चार हजार रुग्णांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे डॉ.सांतनू कुमार साहू यांनी यावेळी सांगितले.

भुसावळातील हॉस्पीटलचा असा आहे पत्ता
ज्ञानरंजन टॉवर, सुराणा बिल्डींगजवळ, आनंद नगर, जामनेर रोड, भुसावळ, जि.जळगाव संपर्क- 7773944435






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !