भुसावळातील वरिष्ठ छायाचित्रकारांनी साजरा केला छायाचित्रण दिन


Senior photographers from Bhusawal celebrated Photography Day भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : भुसावळ  शहरातील वरिष्ठ छायाचित्रकारांनी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण दिन उत्साहात साजरा केला. शहरातील शिव कॉलनीत भुसावळातील सीनियर फोटोग्राफरतर्फे 19 ऑगस्ट हा दिन आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी रेल्वे स्कूलचे सेवानिवृत्त कलाशिक्षक राजेंद्र जावळे, अविनाश साळी, गोकुळ महाजन, लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार व छायाचित्रकार श्याम गोविंदा, गणेश राठोड, मुकेश नेवे, कल्पना जावळे, ज्योती महाजन, आभा साळी, दीपाली पाटील, स्मिता राठोड, प्रीती नेवे, नीरज पाटील, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.


सुरुवातीला महिलांनी दीपप्रज्वलन करून कॅमेरा पूजन केले. त्यानंतर सर्व सिनियर फोटोग्राफरांनी सामूहिक कॅमेरा पूजन केले व जागतिक छायाचित्र दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अविनाश साळी तर आभार प्रदर्शन आपल्या कवितेतून राजेंद्र जावळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व सीनियर फोटोग्राफर बांधवांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !