जळगावातील मु.जे.महाविद्यालय बीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण


Training of B.Sc. students of Mu.J. College, Jalgaon ममुराबाद (19 ऑगस्ट 2025) : कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने मृदा व जल तपासणी प्रयोगशाळा ममुराबाद येथे सोमवार, 18 आगस्ट 2025 पासून आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माती व पाणी परीक्षणाबाबत तसेच विविध प्रकारच्या परीक्षण यंत्रांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या प्रसंगी जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी भारताच्या गतिशील व जलद प्रगतीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले.


कृषी विभागात असलेल्या स्वयंरोजगाराच्या योजनादेखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगितल्या. कार्यक्रमात त्यांनी विज्ञानाधारित शेतीकरिता माती व पाणी परीक्षण याचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.

प्रयोग शाळेतील पर्यवेक्षक दिगंबर पवार, देविदास भगत यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन मु.जे.महाविद्यालय, सहायक प्रा.सोनल उपलपवार यांनी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !