नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर शिपायाला एका दिवसांची पोलिस कोठडी


Bribery constable at Navapur Land Records Office remanded in police custody for one day नंदुरबार (20 ऑगस्ट 2025) : वनक्षेत्रातील जमिनीच्या चतु:सीमा, एकत्रीकरण व आकारबंद अशा दस्तावेजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात आठशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली होती. आरोपीला बुधवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आहेत.

असे आहे लाच प्रकरण
कुकराण, ता.नवापूर येथील 44 वर्षीय तक्रारदाराने 13 ऑगस्ट 2025 रोजी लेखी तक्रार दिली की, त्याांची शेतजमीन कुकराण, ता.नवापूर गावाचे वनक्षेत्रात आहे. या जमिनीचे हक्कासंबंधीचे चतु:सीमा, एकत्रीकरण व आकारबंद अशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक हजारांची लाच मागण्यात आली व एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला व आठशे रुपयांची लाच घेताच आरोपी शिपायाला मंगळवारी पथकाकडून अटक करण्यात आली.




आरोपीला बुधवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीच्या आवाजाचे व्हाईस सॅम्पल एसीबीने घेतले आहे. अधिक तपास नंदुरबार पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते व सहकारी करीत आहेत.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !