दहिवदला जुन्या वादातून तरुणाचा खून : आरोपी शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात


Young man murdered in Dahiwad over old dispute : Accused in Shirpur taluka police net शिरपूर (20 ऑगस्ट 2025) : जुन्या वादातून दहिवद येथील एकाचा मारहाण करीत खून करण्यात आला होता. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विनायक उर्फ बारकू काशीनाथ पाटील (37, दहिवद) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर उमेश उर्फ दादू विश्वनाथ चव्हाण (28, दहिवद, ता.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय घडले दहिवद गावात ?
पोलिसांच्या माहितीनुसार, रुहाणी मानव केंद्राजवळ विनायक पाटील हा मृतावस्थेत पडून होता शिवाय त्याच्या नाका-तोंडातुन रक्त निघत असल्याने त्यास खाजगी अ‍ॅम्ब्युलन्सने कॉटेज हॉस्पीटल, शिरपूर येथे उपचारार्थ हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषीत केले.




पोलिसांनी केलेल्या तपासात उमेश उर्फ दादू विश्वनाथ चव्हाण यानेच जुन्या भांडणाच्या कारणावरुन बारकू काशीनाथ पाटील यास 17 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास व 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपूर्वी तोंडावर व पोटात फुफुसाजवळ लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन जीवे ठार मारत पळ काढला. या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ चुनीलाल जगन्नाथ पाटील (42, महादेव मंदिरामागे दहिवद) यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुनील वसावे हे करीत आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे व पोलिसांनी आरोपीला अटक केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !