धुळ्यात तडीपार गुन्हेगाराचा प्रवेश : गुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या


Entry of a criminal from abroad into Dhule : Crime Branch keeps a tight lid on it धुळे (20 ऑगस्ट 2025) : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हद्दपार करण्यात आलेला संशयीत पुन्हा धुळ्यात दाखल झाल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाला संशयीताला अटक करीत त्याच्याविरोधात भादंवि 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला. शेखर दत्तू वाघमोडे (25, रा.हटकरवाडी, चितोड रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने गुन्हा
पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सहा महिन्यांसाठी हद्दपार संशयीत शेख वाघमोडे हा हा सक्षम अधिकार्‍यांच्या पूर्व परवानगी शिवाय प्रतिबंधित क्षेत्र धुळे शहरात फिरत असल्याची गोपनिय माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यास चितोडरोड वरील हटकरवाडी येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




यांनी केली कारवाई
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, पोलिस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, शशिकांत देवरे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, हर्षल चौधरी, विनायक खैरनार व जगदीश सूर्यवंशी 1आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !