भुसावळ तापी रनिंग ग्रुपची ब्रम्हगिरी मॅरेथॉनमध्ये यशस्वी घौडदौड


Bhusawal Tapi Running Group’s successful run in Brahmagiri Marathon भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : नाशिक येथील स्टोन रिज व्हॅली, ब्रम्हगिरीपर्वत परिसरात नुकतीच 23 किलोमीटर अंतराची पर्वत परिक्रमा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. खडतर डोंगराळ भाग, सतत चढ-उतार आणि निसर्गरम्य पण आव्हानात्मक वातावरण असलेल्या या मॅरेथॉनमध्ये भुसावळ येथील तापी रनिंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत ग्रुपचे मार्गदर्शक डॉ.तुषार पाटील, विजय फिरके, जितेंद्र चौधरी व धनसिंग पाटील यांनी यशस्वीपणे धाव घेतली. विशेष उल्लेखनीय म्हणजे 50 वर्षावरील वयोगटात विजय फिरके यांनी ही कठीण मॅरेथॉन अवघ्या तीन तास 40 मिनिटांत पूर्ण करत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. इतर सदस्यांनी सुध्दा उत्कृष्ट कामगिरी करत मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल भुसावळ शहरात विविध क्रीडा गटांतर्फे विजेते व सहभागी धावपटूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तापी रनिंग ग्रुपचे कोच अजय आंबेकर, तरुण बिरिया, संजय भदाणे, मुनेश चौधरी, संतोष जाधव आदींचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !