विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बनवल्या गणेश मूर्ती : द वर्ल्ड स्कूलमध्ये कार्यशाळा
Students make Ganesh idols from clay : Workshop at The World School भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यावर कार्यशाळा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध गणेशमूर्ती तयार केल्या
गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच मुलांमधील उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यावर कार्यशाळा घेण्यात आली.

कला शिक्षिका ज्योती राठोड यांनी विद्यार्थ्यांनसमोर एक गणपती तयार करून दाखवला आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार केल्या. हा कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. गणेश मूर्ती बघून शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




