भुसावळातील आनंद नगरात इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट ; गादी, चादरी जळाल्या


भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील आनंदनगर भागात गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता इन्व्हर्टरच्या बॅटरीचा स्फोट होऊन घरातील साहित्य जळून नुकसान झाले मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तर वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठी हानी टळली.

अचानक लागली आग
आनंदनगर परिसरातील पुरुषोत्तम गाजरे यांच्या घरातील इन्व्हर्टर बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यातून निर्माण झालेल्या आगीमुळे घरातील गादी, चादरीसह इतर साहित्य जळाले. शहरातील गोल्डन अवरचे फार्मासिस्ट जितेश ढाके व एचआर प्रमुख गिरीश कोळी व सहकार्‍यांनी वेळीच धाव घेत अग्निरोधक सिलिंडरद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले तर काहीच वेळे भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.

अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात मोठी गर्दी जमली व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळीच आग विझवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !